लवकरच बाजारात येणार मारुतीची डिझेल सिलेरिओ

maruti
नवी दिल्ली- मारुती सुझुकीचे नवे मॉडेल लाँच होण्यासाठी सज्ज आहे. मारुती सेलेरिओ ही स्वस्त डिझेल कार लवकरच बाजारात येणार आहे. ऑटोमॅटिक मॅन्युयल ट्रान्समिशन गियरबॉक्स हे या कारचे वैशिष्ट्य असेल.

८०० सीसी क्षमतेचे इंजिन पूर्ण भारतीय बनावटीचे आहे. ही कार एका लीटरला तीस किलोमीटर धावणार आहे. या कारमुळे छोट्या कार किंवा हॅचबॅक कारच्या विक्रीत वाढ होईल असे सांगण्यात येत आहे. सेलेरिओचे पेट्रोल मॉडेल देखील बाजारात उपलब्ध आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये झालेली घट ही सुद्धा कार विक्रीसाठी पोषक ठरेल असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.