मर्सिडीजची सी क्लास वर्ल्ड कार ऑफ इ इयर

cclass
न्यूयॉर्क येथे झालेल्या कारच्या विविध कॅटेगरीतील स्पर्धात मर्सिडीज या जर्मन कार कंपनीने यंदा वर्चस्व गाजविले आहे. मर्सिडीजची सी क्लास कार ही वर्ल्ड कार ऑफ द इयर २०१५ म्हणून निवडली गेली असून १ जानेवारी २०१४ ते ३१ मे २०१५ या कालावधीत कार जो परफॉर्मन्स देतात त्यावरून हे अॅवार्ड ठरविले जाते. या स्पर्धेत सी क्लासने फोर्ड मस्तंग व फॉक्सवॅगनच्या पसाटला मागे टाकून हे अॅवॉर्ड मिळविले.

अन्य कॅटेगरीत मर्सिडीज बेंझची एस क्लास कुपे २०१५ वर्ल्ड लकझरी कार ट्रॅाफीची मानकरी ठरली. या स्पर्धेत तिने बीएमडब्ल्यू आय एट व रेंजरोव्हरच्या ऑटोबायोग्राफी ब्लॅक एलडब्ल्यू बी ला मागे टाकले. मर्सिडीजच्याच एएमजी जीटी ने वर्ल्ड परफॉर्मन्स कार म्हणून आपले नांव अॅवॉर्डवर कोरताना जग्वारच्या एफ टाईप आर कूपे व बीएमडब्ल्यूच्या एम फोरला मागे टाकले.

बीएमडब्ल्यू आय एट वर्ल्ड ग्रीन कार टाली तर सिट्रॅयन सी फोर कॅक्टस ला २०१५ चे वर्ल्ड कार डिझाईन कॅटॅगरीतील अॅवॉर्ड मिळाले. वर्ल्ड कार ऑफ द इयर अॅवॉर्डसाठी कोणत्याही वाहनाला किमान दोन महाद्विपात ते वाहन विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे लागते.