माणूस ३९ दिवसांत पोहोचणार मंगळावर

mars
मंगळावर जाण्यासाठी माणसांचा नियमित प्रवास सुरू होणे आता कांही वर्षांचाच प्रश्न राहिला आहे. मात्र हा प्रवास अधिक वेगाने म्हणजे केवळ ३९ दिवसांतच पूर्ण करता यावा यासाठी एक खास इंजिन बनविले जात असून या प्रकल्पासाठी नासाने संबंधित कंपनीला तीन वर्षांसाठी १ कोटी डॉलर्सचे अनुदान दिले असल्याचे समजते.

अमेरिकेच्या टेक्सास भागातील वेबस्टर अॅड एस्ट्रा रॉकेट कंपनीतर्फे वस्मिर इंजिन विकसित केले जात आहे. या इंजिनात पारंपारिक इंधनाऐवजी प्लाझ्मा गॅसचा वापर केला जात आहे. कंपनीचे सीइ्रर्ओ फ्रँकलीन चंग हे स्वतः अंतराळवीर असून त्यांनी आत्तापर्यंत सातवेळा अंतराळ प्रवास केला आहे. ते सांगतात, प्लाझ्मा वापरले जाणारे वस्मिर रॉकेट वास्तविक प्रक्षेपणासाठी वापरले जात नाही. मात्र गॅस प्लाझ्माचा वापर करून आम्ही इंजिन विकसित करत आहोत. हे इंजिन रेडिओ लहरींच्या मदतीने प्लाझ्माला अत्याधिक तापमानावर गरम करते. चुंबकीय क्षेत्र या प्लाझ्माला इंजिनाच्या मागच्या बाजूने बाहेर ढकलते व त्यामुळे जोरदार धक्का बसून वेगाने इंजिन पुढे जाते. अंतराळातील प्रवासासाठी हे इंजिन ३ वर्षात वापरात आणले जाईल व त्याच्या सहाय्याने मंगळ, चंद्रावरची सफर थोड्या दिवसांत पूर्ण करता येईल.

Leave a Comment