नक्षलविरोधी कारवाईत २ बहादूर श्वानांना मेडल

dogs
सीआरपीएफ जवानांना नक्षलविरोधी कारवाईत मदत करून शौर्य गाजविणार्‍या अफरीन आणि रूडॉल्फ या दोन श्नानांना वीरता पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. या दोन्ही श्वानांना त्यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल रांचीच्या मुख्यालयात मेडल दिली गेली. लातेहार भागात नक्षलवाद्यांविरोधातल्या कारवाईत हे दोन्ही श्वान सहभागी झाले होते.

कमांडंड पी.मनोजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे पाच वर्षांचे जर्मन शेफर्ड जातीचे हे श्वान आहेत. अत्यंत तल्लख आणि शूर अशी ही जोडी २८ मार्चला लातेहारच्या जंगलात सीआपीएफ जवानांनी चालविलेल्या नक्षलशोध मोहिमेत सहभागी झाली. नक्षलवाद्यांनी जवानांवर जबरदस्त गोळीबार केला मात्र गोळीबार थांबल्यानंतर चालविलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये या श्वानांनी सर्च पथकाचे नेतृत्व करताना एका नक्षल्याला पळून जाताना पकडले.

या श्वानांची खासियत म्हणजे त्यांना फक्त नक्षलविरोधी कारवायांतच सहभागी करून घेतले जाते. त्यांची देखभाल अतिशय उत्तम पद्धतीने केली जाते आणि त्यांना कच्च्या मासाचा आहार दिला जातो.

Leave a Comment