सूटकेस कम टेबल कम चार्जर

suitcase
किकस्टार्टर या प्रवासी लगेज बनविणार्‍या कंपनीने त्यांच्या मेक शी लगेज मालिकेतील एक अनोखी सुटकेस १ एप्रिल रोजी सादर केली आहे. विशेष म्हणजे ही सुटकेस गरज असेल तेव्हा टेबलात रूपांतरीत होऊ शकते. विशेषतः विमानप्रवाशांना जेव्हा इमिग्रेशन, कस्टम फॉर्म भरताना उपलब्ध असलेल्या छोट्या टेबलांवर गर्दीत ताटकळावे लागते त्यावर स्वतःचे टेबल हा उत्तम पर्याय असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

या सुटकेसचे झाकण उघडले की त्यापासून टेबल तयार होऊ शकते. टेबलाच्या वरपासून खालपर्यंत चेनवाले कप्पे आहेत. झाकण उघडले की हे सर्व कप्पे दिसतात. चार्जरच्या तारा ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. मेकशी ला २० हजार एमएएच पॉवर बॅकअप व दोन यूएसबी पोर्टही आहेत. त्यामुळे ७ ते ८ वेळा फोन चार्ज करता येतो. त्याला रीड आऊट बॅटरी आहे त्यामुळे बॅटरी कधी चार्ज करायला हवीय तेही समजू शकते. सर्वात छोटे यूएसबी असलेले युनिट २२४ डॉलर्स, मध्यम २४४ डॉलर्स तर मेगा व्हर्जन ४९९ डॉलर्समध्ये उपलब्ध आहे. ही सुटकेस कम टेबल कम चार्जर युजरला नक्कीच किंमत मोजल्याचे समाधान देईल असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.

Leave a Comment