व्हॉटस्अॅपचे कॉल मोफत नाहीत….

whatsapp
नवी दिल्ली : व्हॉटस्अॅप कॉलिंगची सेवा सुरू झाली असून असे कॉल करताना कॉल करणारा आणि स्वीकारणारा या दोघांचे डेटा कनेक्शन सुरू असणे गरजेचे असते आणि कॉलमध्ये डेटा खर्ची पडत असल्यामुळे व्हॉटस्अॅतप कॉल मोफत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.

वेगवेगळ्या अफवा व्हॉटसअॅणपच्या मोफत कॉलिंगच्या बाबतीत पसरविल्या जात आहेत. अर्थात, हे कॉलिंग मोफत असल्याचे मॅसेज सर्वत्र फिरत आहेत. परंतु प्रत्यक्षात तसे नाही, तर त्यासाठी कॉलिंग डेटा खर्च करावा लागणार आहे. मुळात व्हॉटसअॅ पच्या माध्यमातून कॉल करण्यासाठी वेगवान डेटा कनेक्शन असावे, अशी किमान अपेक्षा आहे. अ नामक कॉलरने ब नावाच्या मित्राला थ्रीजी मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून कॉल केल्यानंतर (मित्र प्रतिसेकंद आठ मेगाबाईट वेगाचे वायफाय कनेक्शन वापरतो) आवाज अस्पष्ट असल्याचे जाणवले. त्यानंतर मित्राने कॉल केल्यानंतर आवाज सुस्पष्ट असल्याचे जाणवले. त्यानंतर अनेक मित्राला थ्रीजी नेटवर्कच्या मदतीने कॉल केला असता वरीलप्रमाणे अनुभव आला. त्यानंतर अ ने थ्रीजीऐवजी टूजी नेटवर्कची मदत घेतली. पहिल्या प्रयत्नात कॉल पूर्ण होऊ शकला नाही. ब-याच वेळानंतर कॉल लागला; पण कॉलिंगचा दर्जा खूपच सुमार होता.
साधारणत: एका मिनिटाच्या थ्रीजी व्हॉटसअॅयप कॉलिंगसाठी ०.१५ एमबी ते ०.२० एमबी थ्रीजी डेटा खर्ची पडतो. याचाच अर्थ पाच मिनिटाच्या एका कॉलसाठी एक एमबी थ्रीजी डेटा वापरला जातो. टूजी नेटवर्कमधून करण्यात येणा-या कॉलिंगपेक्षा थ्रीजी नेटवर्कमधून करण्यात येणा-या कॉलचा दर्जा थोडा तरी वरचा आहे. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे थ्रीजी नेटवर्कमधून करण्यात येणा-या कॉलिंगपेक्षा टूजी कॉलिंग महाग पडत आहे. एका मिनिटाच्या टूजी कॉलिंगसाठी ०.३५ एमबी डेटा वापरला जातो.

तुम्ही वायफाय नेटवर्कचा उपयोग करणार असाल, तर आंतरराष्ट्रीय कॉलसाठी व्हॉटसअॅहप कॉलिंगकडे सुवर्णसंधी म्हणून पाहायला हवे. मोफत कॉलिंगच्या नावाखाली मिळणा-या महसुलाकडे पाहून व्हॉटसअॅडप या सुविधेमध्ये अधिकाधिक सुधारणा करण्याचा निरंतर प्रयत्न करत आहे. ही सुविधा दूरसंचार कंपन्यांच्या डोळ्यावर आल्यास त्यांच्याकडून ट्रायकडे तक्रार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment