रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार पिझ्झा आणि केएफसीचे पदार्थ

railway
मुंबई : आयआरसीटीसीने आपल्या प्रवाशांसाठी पिझ्झा हट आणि केएफसी यांच्या सहयोगाने ई-केटरींगची सुविधा उपलब्ध करून दिली असून यामुळे जर का रेल्वे प्रवासात तुम्हाला पिझ्झा किंवा केएफसीमधले पदार्थ खायची इच्छा झाली तर ती पूर्ण होणार आहे.

या पदार्थांची ऑर्डर आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवासाच्या ४८ तास आधी करता येईल. त्यामध्ये ठिकाण आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. ही सुविधा देशभरातल्या विविध १२ रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर या सुविधेचा दुरांतो आणि राजधानी एक्सप्रेसमधल्या प्रवाशांना लाभ घेता येईल. कॅफे कॉफी डे, बरिस्ता कॉफी, जंबो किंग, या जलद सेवा देणाऱ्या रेस्टॉरंट्ससोबतही चर्चा सुरू असून लवकरच हे रेस्टॉरंट रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सेवा देतील. असे रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment