औरंगाबादेतील निद्रिस्त भद्र हनुमान

bhadra
आज हनुमानजयंती. औरंगाबाद पासून जवळच असलेल्या खुल्ताबाद येथील भद्र हनुमान मंदिर आज भक्तांच्या गर्दीने ओसंडून जाईल कारण हा हनुमान सर्व इच्छा पूर्ण करणारा हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरात प्रत्येक गावोगावी हनुमान मंदिरे असली तरी निद्रीस्त हनुमानाची मंदिरे मात्र कांही मोजक्या ठिकाणीच आहेत. त्यातील हे एक मंदिर आहे.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने येथे मोठा सोहळा होतोच पण श्रावणात भाविक अनवाणी या हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून येतात. या मंदिराची कथा सांगितली जाते ती अशी. राजा राजशी भद्रसेन येथील तलावाकिनारी हनुमान स्तुतीची गीते गात असे. एकदा त्याच्या या भक्तीवर खूष होऊन हनुमान स्वतः प्रकट झाले आणि राजाची गाणी ऐकू लागले. त्यात ते इतके तल्लीन झाले की कधी झोप लागली हे हनुमानाला समजले नाही. तेव्हापासून हा हनुमान येथे निद्रिस्त स्वरूपातच आहे. नोकरी, शिक्षण, घरदार अशा भाविकांच्या इच्छा हा हनुमान पूर्ण करतो असा विश्वास असल्याने येथे भाविकांची गर्दी खूप असते.

अशा प्रकारचे निद्रिस्त हनुमान उत्तर प्रदेशातील इटावा, पिलुआ ग्राम, अलाहाबादेतील संगमघाट, चंदोली जिल्ह्यात, गुजराथेतील राजकोट, राजस्थानातील अलवर, मध्यप्रदेशातील जामसावली येथेही आहेत.

Leave a Comment