हिरोची इलेक्ट्रीक रिक्षा राही

rahi
दुचाकी वाहन उत्पादनातील आघाडीची कंपनी हिरो ने त्यांची इलेक्ट्रीक रिक्षा गुरूवारी सादर केली असून दिल्लीत या रिक्शाची किंमत १ लाख १० हजार रूपये आहे. रिक्शाचे नामकरण राही असे केले गेले आहे.

कंपनीचे सीईओ सोहिन्दर गिल यासंदर्भात म्हणाले की या रिक्शाचे मॉडेल अशा प्रकारे डिझाईन केले गेले आहे, ज्यामुळे चालक आणि प्रवासी यांना रोजच्या प्रवासात सोसाव्या लागणार्‍या अडचणींचे निराकरण होणार आहे. भारतीय वाहन संघाने प्रमाणित केल्यानुसार या रिक्शासाठी १ हजार वॉटची मोटर बसविली गेली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही रिक्शा ९० किमीचा प्रवास करू शकणार आहे. यात अंतर्गत एलईडी लाईट, चालकासाठी यूएसबी मोबाईल चार्जरची सुविधा दिली गेली आहे.

कंपनी त्यांच्या १२० वितरकांच्या मार्फत या रिक्शांची विक्री करणार आहे. कंपनीने आत्तापर्यंत देशात १ लाखांहून अधिक इलेक्ट्रीक दुचाकी वाहने विकली आहेत. प.बंगाल, उ.प्र., दिल्ली व गुजराथ राज्यात ई रिक्शाची चांगली विक्री होईल अशी कंपनीला आशा आहे.

Leave a Comment