सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ३०० कोटींचा निधी

sindhudurg
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी राज्याने पुढील तीन वर्षांसाठी ३०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात १०० कोटी निधीची तरतूद केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी पुढील पाच वर्षांचा पर्यटन विकास आराखडा तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.

या आराखड्यात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास, पर्यटनस्थळांकडे जाणा-या रस्त्यांचा विकास, पर्यटकांसाठी मनोरंजनाची साधने व सुविधा निर्माण करणे, आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करणे आदी विविध कामांचा समावेश होता. सुमारे १५०० कोटींच्या अपेक्षित आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात तीन वर्षांत ३०० कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याने घेतला. २०१५-१६ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी १०० कोटी निधीची तरतूद केली आहे. या निधीतून आराखडड्यात समाविष्ट असलेल्या कामांपैकी काही कामे प्राधान्याने घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Comment