गेट्रर्ड विवर जगात वयाने ज्येष्ठ

oldest
जपानच्या मिसाव ओकावा या जगातील वयोवृद्ध महिलेचे नुकतेच निधन झाल्यानंतर तिची जागा आता गेट्रर्ड विवर या अमेरिकन महिलेने घेतली आहे. विवर यांचे वय ११६ वर्षांचे असून उपलब्ध कागदपत्रांनुसार त्यांचा जन्म ४ जुलै १८९८ साली झाला आहे.

विवर सध्या कॅमेडॉन अर्कान्सास येथील सिल्व्हर ओक्स हेल्थ अॅन्ड रिहॅबिलिएशन नर्सिंग होम मध्ये वास्तव्यास आहेत. आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना त्या म्हणतात की जन्मभर मी दुसर्‍यांशी नेहमीच चांगली वर्तणूक ठेवली. आपल्या वाढदिवशी अमेरिकन प्रेसिडेंड बराक ओबामा यांनी उपस्थिती लावावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यामागचे कारण सांगताना त्या म्हणतात की ओबामांना मी दोन वेळा मत दिले आहे. त्यामुळे त्यांना भेटण्याची माझी इच्छा आहे आणि ही भेट माझ्या वाढदिवशी व्हावी असेही वाटते..

विवर हालचालीसाठी व्हीलचेअरवर अवलंबून आहेत. तेथे बसूनच त्या आठवड्यातून तीन वेळा व्यायाम करतात. दिवसातून तीन वेळा डायनिंग रूममध्ये जाऊन जेवण घेतात.

Leave a Comment