तुमच्या स्मार्टफोनमधील डाटा निशुल्क मोबाईल अॅप संपविते !

mobile-data
वाशिग्ंटन – इंटरनेटवरुन निशुल्क कोणतेही मोबाईल एप्लिकेशन (अॅप) डाउनलोड करुन घेण्याची सुविधा स्मार्टफोनधारकांना पुरविण्यात आली आहे. परंतु कोणतेही अॅप आपल्या मोबईलमध्ये डाऊनलोड करुन घेताना यापुढे सर्तकता बाळगावी लागणार आहे. कारण निशुल्क अॅप डाऊनलोड करुन घेताना मोबाईलमधील बॅटरी झपाट्याने खाली होते. त्यामुळे इंटरनेट सेवेची गती मंदावते परिणामी नेट डाटा लवकर संपतो. वॉशिग्टनमधील संशाधकांनी एका प्रयोगाद्वारे हे सिध्द केले आहे. यामध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

गुगल प्ले स्टोअरमधून कोणतेही अॅप डाऊनलोड करत असताना मोबाईलमधील १६ टक्के अधिक बॅटरी संपविते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीचे चार्जिंग २.५ ते २.१ तासांनी कमी होते. जास्त प्रमाणात डाटा डाऊनलोडिंग सुरू साहिल्यास सरासरी १.७ तासांमध्ये बॅटरीचे चार्जिंग संपूर्णपणे संपते.

साउथर्न कॅलिफोर्निया, रोचेस्टर इन्सिस्टयुट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्वीन्स विद्यापीठ कॅनडाच्या संशोधकांनी सांगितले की, स्र्मार्टफोनमधील सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हा स्मार्टफोनचा मेंदू म्हणून काम करतो. इंटरनेटवरील जाहिराती आणि अॅपच्या डाऊनलोडिंगमुळे यावर ताण पडतो आणि त्याची काम करण्याची गती मंदावते.

असे अॅप डाऊनलोड करताना सीपीयुचा ४८ टक्के अधिक वेळ आणि २२ टक्के अधिक मेमरी खर्च होते. त्यामुळे सीपीयुवर ५६ टक्के अधिक ताण पडतो. असे अॅप डाऊनलोड करताना स्मार्टफोनमधील अधिक डाटा वापरला जातो. कधी-कधी १०० टक्के डाटा संपवला जातो. सरासरी ७९ टक्के अधिक डाटा खर्ट होतो.

Leave a Comment