लवकरच येतेय भारताची पहिली सुपरकार एम झिरो

m-zero
सुपरकार बनविण्यात आजपर्यंत जर्मनी आणि इटाली या देशांचे वर्चस्व असले तरी भारतातही पहिली सुपरकार लवकरच येत आहे.एम झिरो या नावाने येणारी ही कार मीन मेटल मोटर्स कंपनीकडून बनविली जात आहे.

कंपनीचे संस्थापक व संचालक सार्थक पॉल या संदर्भात माहिती देताना म्हणाले की, आम्ही या कारसाठी ४.० लिटर एएमजी व्ही ८ बायटर्ब इंजिन बसविणार असून त्यासाठी बोलणी सुरू आहेत. गाडीचा कमाल वेग ३२० किमी असेल आणि ० ते १०० चा वेग ती ३ सेकंदापेक्षा कमी वेळात गाठू शकणार आहे. ही हायब्रीड सुपरकार आहे आणि त्यात इलेक्ट्रीक मोटरही असेल. कारचे एअरोडायनॅमिक्स उत्तम दर्जाचे असून हायस्पीडलाही ही कार स्थिर राहील. कारसाठी मिश्र धातूची बॉडी बनविली गेली आहे.

या कारचे वैशिष्ठ म्हणजे त्यात वापरण्यात आलेले क्रॉस हेअर तंत्रज्ञान. यामुळे कारचा मालकच फक्त कार उघडू शकतो. परिणामी चोरट्यांना ही कार चोरली तरी उघडता येणार नाही. या कारसाठी चार देशातील चार टीम काम करत आहेत. पोर्तुगाल आणि इटाली कारची बॉडी आणि स्टाईलवर काम करत आहेत. इंग्लंड सिम्युलेशन अॅनालिसिसवर काम करत आहे तर भारतीय टीम इंजिन, ट्रान्समिशन, एअरोडायनामिक्स, व्हेईकल डायनामिकस, इलेक्ट्रॅनिक्स व एनर्जी स्टोरेज यावर काम करत आहे.

Leave a Comment