गुगलचा क्रोमबिट जून- जुलैत येणार

cromebit
तैवानची कंपनी आसूस आणि गुगल यांनी संयुक्त सहकार्यातून बनविलेला कॉम्प्युटर ऑन स्टीक लाँच करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. क्रोम बिट नावाने ही स्टीक बाजारात येत असून ती क्रोम ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार आहे. याची किंमत अगदी कमी म्हणजे केवळ ६५० इतकीच आहे आणि क्रोमबिट प्लग केल्यानंतर कुठल्याही डिस्प्लेचे रूपांतर संगणकात करून वापरता येणार आहे.

जून अथवा जुलैत क्रोमबिट लाँच केले जाईल असे कंपनीच्या वरीष्ठ सूत्रांकडून सांगितले जात आहे. कँडीबार अथवा पेन ड्राईव्ह प्रमाणे दिसणारी ही स्टीक संगणकाची सर्व कामे करू शकणार आहे. याचा वापर शाळा, व्यवसाय अथवा परिषदांसारख्या ठिकाणी फार उपयुक्त ठरणार आहे. क्रोमबिट बरोबरच गुगलने लो कॉस्ट लॅपटॉपचीही घोषणा केली असून हा लॅपटॉप १० हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार आहे. यासाठी त्यांनी चीनमधील एका कंपनीचे सहकार्य घेतले आहे.

Leave a Comment