नवी दिल्ली : नुकताच गूगलने जीमेल अॅ्प अपडेट करण्याचा निर्णय घेतला असून अपडेशननंतर त्यात नवे फीचर्स जोडले जाणार आहेत. याहू, आऊटलूकचे ई-मेल्सही या नव्या फीचर्सच्या मदतीने बघता येणार आहेत.
याहू, आऊट लूकचे ई-मेल आता जी-मेल अॅपवरच
अपडेट झाल्यानंतर ‘ऑल इनबॉक्स’ नावाचा नवा पर्याय अपडेटेड जीमेल पमध्ये असणार आहे. त्याच्या मदतीने सर्व मेल्स एकाच ठिकाणी बघता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे दोन ई-मेल अकाऊंट्स असलेल्या युजर्सकरिता हे नवे फीचर अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. हा नवा प गूगलच्या रायव्हल सर्विससारखे याहू आणि मायक्रोसॉफ्ट आऊटलूकच्या अकाऊंट्सलाही सपोर्ट करेल, अशी माहिती गूगलचे सॉफ्टवेअर इंजिनिअर रेगिस डीकॅम्प्स यांनी दिली. युजर्सना डेस्कटॉप संगणकावर एकाचवेळी अनेक अकाऊंट्स क्सेस करण्याची सुविधा जीमेलने याआधीच उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे नवे प ई-मेल सेवा देणारे वेगवेगळे अकाऊंट्स ऑपरेट करण्याची सुविधा देणार आहे. लवकरच जीमेल ही सुविधा युजर्ससाठी आणणार आहे.