चीनमधील सर्वात श्रीमंत बनली सामान्य कामगार महिला!

queen
बीजिंग: आज चीनमधील सगळ्यात श्रीमंत महिला म्हणून एका साध्या कंपनीत काम करणारी ‘झोउ क्यूनफेई’ ही ओळखली जात असून कंपनीतील सामान्य कामगार, त्यानंतर अॅप्पल कंपनीची पुरवठादार आणि आता एका कंपनीची अध्यक्षा. असा तिचा यशाचा चढता आलेख आहे. झोउची ‘लेन्स टेक्नोलॉज’ ही कंपनी आज घडीला अॅप्पल, सॅमसंग आणि इतर नामांकित मोबाइल कंपन्यांना टचस्क्रिन ग्लासचा पुरवठा करते.

आज झोउची ओळख ‘क्वीन ऑफ मोबाइल फोन्स ग्लास’ अशी आहे. फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार, सध्या झोउची संपत्ती ८ अब्ज डॉलर एवढी आहे. झोउची लेन्स टेक्नोलॉजी ही कंपनी मागील महिन्यातच शेनझेन शेअर बाजारांच्या यादीमध्ये आली आहे. तसेच मागील 10 दिवसांपासून त्यांच्या शेअरमध्येही चांगलीच वाढ झाली आहे.

Leave a Comment