गुगल ग्लासवरून नृत्याच्या स्टेप्स शिकता येणार

google
गाणे ओळखून त्याला अनुरूप अशा नृत्याच्या स्टेप्स शिकण्यासाठी यापुढे डान्स क्लास लावण्याची गरज राहणार नाही कारण गुगलने ही सुविधा त्यांच्या गुगल ग्लासवर उपलब्ध करून दिली आहे. गेली तीन वर्षे त्यावर संशोधन सुरू होते आणि आता अनेक बदल करून डान्स स्टेप्स शिकवू शकणारी गुगल ग्लास तयार झाली आहे. गुगलने त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. तज्ञांच्या मते वेअरेबल डिव्हायसेसमध्ये ही महत्त्वपूर्ण कामगिरी गुगलने बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुगल ग्लासच्या वरच्या भागात सिनेमा स्क्रीनप्रमाणे प्रतिमा दिसते. यात गाण्याला अनुसरून योग्य अशा डान्सच्या स्टेप्सही दाखविल्या जातात. त्याचे अनुकरण करून युजर डान्स करू शकतो. ही ग्लास गाणे ओळखून त्यानुसार अॅनिमेशन करून डान्स स्टेप दाखविते. सध्या अॅनिमेशन लायब्ररी करण्याचे काम गुगलने हाती घेतले असून नंतर गाण्याचे व्हिडीओही दिसू शकणार आहेत. अगदी रिमिक्स गाण्याचे व्हिडीओही दिसू शकणार आहेत.

Leave a Comment