शास्त्रज्ञांना मंगळ ग्रहावर पुन्हा मिळाले पाणी असल्याचे पुरावे !

mars
वॉशिंग्टन – मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे शास्त्रज्ञांना पून्हा एकदा पुरावे सापडले आहेत. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या पत्रिकेत छापलेल्या माहितीनुसार, मंगळ ग्रहाच्या क्रेटर युक्त उत्तरी भागात असलेल्या अरबिया टेरा येथे मंगळाच्या भूमध्यरेखीय पठारीय भागाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या ठिकाणाची निर्माण प्रकिया आणि तेथे मानवी जीवनास अनुकुल वातावरणाची शक्यता शास्त्रज्ञ तपासून पाहत आहेत. मंगळ ग्रहाच्या पठारी भागात स्थित असलेला भूमध्यरेखीय पठाराचा भाग अनेक उंचवटीय भाग, एकसारख्या स्तरावरील तसेच एक दुसऱ्यावर तिरप्या पद्धतीने पसरलेल्या रेतीच्या भूभागाने बनलेला आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, या भूमध्यरेखीय उभार असलेल्या या भागाची निर्माण प्रक्रिेया भूमिगत पाण्याच्या स्तराच्या चढ-उतारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पठारावर निर्माण झालेले उंचवटे हे छोट्या छोट्या पाण्याच्या फवाऱ्यांनी बनले आहेत, असे शास्त्रज्ञांचे मानणे आहे.

Leave a Comment