तंबाखूजन्य पदार्थ कायदा अभ्यास समितीच्या अध्यक्षांचा जावईशोध

dilip-gandhi
नवी दिल्ली – संसदेने स्थापलेल्या सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा अभ्यास समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी तंबाखुच्या वापरामुळे कर्करोग होतो याबाबत भारतात संशोधन झाले नसल्याचे वक्तव्य केले आहे.

भारतात तंबाखुमुळे कर्करोग होतो याचे संशोधन झाले नसून सर्व संशोधन विदेशातील असल्यामुळे भारतीय परिप्रेक्ष्यातून तंबाखूवर अभ्यास होणे आवश्यक असल्याचे गांधी म्हणाले. देशातील ४ कोटी जण विडी व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांचा विचारदेखील करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तंबाखूच्या पाकिटावर असणारे चित्र ४० टक्क्यांहून वाढवून ८५ टक्के करण्यात यावे या निर्णयाला काही काळासाठी स्थगिती देण्यात यावी असे ते म्हणाले. तंबाखुच्या दुष्परिणामांबाबत काही दुमत नाही. परंतु केवळ तंबाखुमुळेच कर्करोग होत नसतो. तेव्हा भारतीय संदर्भातून तंबाखुच्या परिणामांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment