ल्युमिया ६४० व ६४० एक्सएल एप्रिलमध्ये भारतात

lumia
मायक्रोसॉफ्टने त्यांचे मिड रेंज ल्युमिया ६४० व ६४० एक्सएल हे दोन स्मार्टफोन एप्रिलमध्ये भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले आहे. हे दोन्ही फोन बार्सिलोनाच्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केले गेले तेव्हा त्यांच्या रूपयांत किंमती अनुक्रमे ८६७२ व ११७७० रूपये अशा होत्या. भारतात हे फोन किती किंमतीला मिळतील ते जाहीर करण्यात आलेले नाही.

ल्युमिया ६४० साठी ५ इंची स्क्रीन, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास,१ जीबी रॅम, ८ जीबी मेमरी, ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यत वाढविण्याची क्षमता, ८ एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश आणि व्हिडीओ शूटिंगच्या फिचरसह दिला गेला असून फ्रंट कॅमेरा १ एमपीचा आहे. या फोनसाठी थ्रीजी, फोरजी कनेकटीव्हीटी आहे.

ल्युमिया ६४० एक्सएलसाठी ५.७ इंची स्क्रीन , कोर्निंग गोरिल्ला ग्लास, कार्ल जिअर लेन्ससह १३ एमपीचा रियर कॅमेरा, सेल्फीसाठी ५एमपीचा कॅमेरा असून त्याच्या सहाय्याने वाईड अँगल फोटो काढणेही शक्य होणार आहे. दोन्ही कॅमेर्‍यांवर व्हिडीओ शूटही करता येणार आहे. १ जबी रॅम,१२८ जीबीपर्यंत मेमरी वाढविण्याची सुविधा अशी अन्य फिचर्स आहेत. तसेच सिंगल, डयअल व फोर जी साठी ड्युअल सिम व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ब्लॅक, ऑरेंज आणि व्हाईट कलरमध्ये हे फोन उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment