पदव्युत्तर वर्गाला वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका

medical
पुणे – पदव्युत्तर वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत असून एकूण ३०० प्रश्नांपैकी ४४ प्रश्नांमध्ये झालेल्या चुका आणि त्यामुळे सतत बदललेल्या गुणवत्ता यादीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

राज्याच्या वैद्यकिय शिक्षण संचालनालयाकडून पदव्युत्तर वैद्यकीय पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. राज्यभरात ही परीक्षा यावर्षी ४ जानेवारीला झाली. परीक्षेसाठी ३०० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी तब्बल ४४ प्रश्नांमध्ये चुका होत्या. संचालनालयाच्या या निष्काळजीपणाचा मनस्ताप मात्र विद्यार्थ्यांना होत आहे. चुकीच्या प्रश्नांमुळे संचालनालयाने प्रवेश यादीत सातत्याने बदल केले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या गुणानुक्रमांत बदल झाले.

Leave a Comment