कालबाह्य होणार रेल्वेचे शौचालय

railway
नवी दिल्ली : २०२०-२१ पर्यंत भारतीय रेल्वेच्या डब्यातील जुने शौचालये कालबाह्य ठरतील. रेल्वे मंत्रालयाचा दरम्यानच्या काळात रेल्वेत पर्यावरणाला अनुकूल जैव शौचालये आणण्याचा प्रयत्न आहे. हेच रेल्वेसमोरील प्रमुख लक्ष्य आहे, असे या योजनेशी संबंधित एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

आतापर्यंत रेल्वेत तब्बल १७ हजार ३३८ शौचालयांचे जैव शौचालयांत रूपांतर करण्यात आले आहे. सर्वच रेल्वे डब्यांत जैव शौचालय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. २०१६-१७ पर्यंत नव्या डब्यांमध्ये जैव शौचालये दिसतील. याबरोबरच सध्याच्या डब्यांमध्ये जैव शौचालये बसविण्याचे काम सुरूच राहील, असेही या अधिका-याने सांगितले. २०१५-१६ दरम्यान दूर अंतरावर धावणा-या रेल्वेंमध्ये १७ हजार जैव शौचालय उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हा स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत योजनेचा एक भाग आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. सध्याच्या शौचालय व्यवस्थेमुळे रेल्वे रुळाचे नुकसान होत आहे. त्यामुळे नव्याने रूळाची व्यवस्था करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.

Leave a Comment