अबुधाबीला जेट एअरवेजचा दैनिक प्रवास

jet-airways
नवी दिल्ली – आजपासून अबुधाबीसाठी आंतरराष्ट्रीय दैनिक विमानसेवा जेट एअरवेज या कंपनीने सुरू केली. पुणे, अहमदाबाद आणि मंगळुरु येथील विमानतळावरुन ही सेवा पुरवण्यात येणार आहे. अहमदाबाद आणि पुणे येथून आंतरराष्ट्रीय सेवा पुरवण्याचा जेट एअरवेजचा हा पहिलाचा प्रयत्न आहे.

भारतातून आंतरराष्ट्रीय सेवा वाढवण्यासाठी ही विमानसेवा जेट एअरवेजने सुरु केली आहे. तसेच आखाती देशात आणि उत्तर अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्याही पुढे विमानसेवा सुरु करण्याचा जेटचा विचार आहे. जेट लवकरच १७८-सेक्टर बोईंग ७३७-८०० हे विमान सुरु करणार असून त्यामध्ये १२ प्रिमीअर वर्गाची आसनक्षमता असणार आहे. तर १५६ सर्वसाधारण म्हणजेच इकॉनॉमी क्लास सुविधा असणार आहे. राष्ट्रीय स्थानिक मार्गावर आम्ही ५ टक्क्यांच्या क्षमतेने पुढे जात आहोत. तर आंतरराष्ट्रीय मार्गांवरील क्षमतेत ११ टक्क्यांनी वाढ करण्यात येत असल्याचेही जेट एअरवेजचे सीईओ क्रेमर बाल यांनी म्हटले.

Leave a Comment