आता ‘द मोबाईल स्टोअर’मध्ये भेटणार ‘शाओमी’

xiomi
नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत स्वत:चे स्थान निश्चित करण्यास ‘शाओमी’ कंपनीने सुरुवात केली असून आतापर्यंत फक्त फ्लिपकार्ट या ऑनलाईन विक्री स्टोअरमधून शाओमीच्या फोन्सची विक्री करण्यात येत होती. मात्र, यापुढे दि मोबाईल स्टोअरमधूनही शाओमी फोन्सची विक्री होणार आहे. त्यासाठी शाओमी या चीनी कंपनीने भारतातील द मोबाईल स्टोअर या कंपन्यांशी करार केला असून १ वर्षात १०० दशलक्ष मोबाईलची विक्री करण्याचे उद्दिष्टे असल्याचे सांगण्यात येते.

जुलै २०१४ पासून शाओमीने पाच मोबाईल आणि १ टॅबलेट भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपींगच्या माध्यमातून या फोन्सची विक्री करण्यात आली. मात्र, आता रेडमी ४ जी आणि एमआय ४ जी हे फोन्स ‘द मोबाईल स्टोअर’ येथेही विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीत दि मोबाईल स्टोअरमध्ये विक्री सुरु करणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे. तर फ्लिपकार्टवरुन शाओमी स्मार्टफोनची ऑनलाईन विक्रीही सुरु राहणार आहे. शाओमीने घेतलेल्या निर्णयाचे ग्राहकांकडून स्वागत होत असून भारतीय ग्राहकांनी या कंपनीला पसंती दर्शवली आहे.

Leave a Comment