वर्षभर अवकाशात राहणार अंतराळवीर – नासा

nasa
बायकोनूर- आज एका वर्षासाठी अवकाश यात्रेला अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केल्ली आणि रशियन अंतराळवीर मिखाईल कॉर्निंको हे निघणार असून त्यांच्यासोबत रशियन अंतराळवीर गेन्नाडी पडालका हे देखील असणार आहेत. परंतु ते सहा महिन्यानंतर परतणार आहेत. हे संपूर्ण वर्ष दोन्ही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात घालवणार असल्याची माहिती नासाने दिली.

संपूर्ण वर्षभराच्या तयारीने अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याची नासाची ही पहिलीच वेळ आहे. स्कॉट केल्ली यांचे जुळे बंधू मार्क हे देखील निवृत्त अंतराळवीर आहेत. त्यांनी आपल्या शरीरावर प्रयोग करु देण्याची आणि अभ्यास करु देण्याची परवानगी दिली आहे. अवकाशात गेल्यानंतर शरीरात काय बदल होतात याचा तुलनात्मक अभ्यास मार्क आणि स्कॉट यांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे नासाने सांगितले आहे. आगामी काळात समानव मंगळ मोहिमेच्या तयारीच्या दृष्टीने अधिक काळ सलग अवकाशात राहण्याच्या अनुभावासाठी ही मोहीम महत्वाची मानण्यात येत आहे.