वर्षातले आठ महिने येथे बोटीने वाटतात टपाल

germany
जर्मनीतील ल्युबिनेयू येथे गेली ११८ वर्षे एक परंपरा चालत आली आहे. परंपरा म्हणण्यापेक्षा आपण याला पद्धत म्हणू शकू. मार्च ते आक्टोबर या आठ महिन्यात या गावात पोस्टमन बोटीतून टपाल वाटपाचे काम करतात. अत्याधुनिक जगात आजही हीच प्रथा येथे सुरू आहे. सध्या येथे एंड्रीया बुनार ही महिला पोस्टमन कामावर आहे आणि तीही या आठ महिन्यात याच पद्धतीने बोट चालवून टपाल वाटप करते.

याचे कारण असे की या गावाभोवती २०० छोटे छोटे कालवे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत हे कालवे पाण्याने गच्च भरतात व त्यामुळे रस्त्यावरून जाणे अवघडच होते. हे क्षेत्र युनेस्कोच्या बायोस्फियर रिझर्व्ह मध्ये येते त्यामुळे येथे अन्य सुधारणा करता येत नाहीत. या गावात ६५ घरे आहेत आणि बोटीने टपाल वाटप करताना रोज किमान ८ किमी बोट हाकावी लागते. म्हणजे एका सीझनमध्ये पोस्टमनला १००० किमीचा प्रवास बोटीने करावा लागतो आणि महिला पोस्टमन बुनारही त्याला अपवाद नाही.

Leave a Comment