नासाच्या यानाला सापडले मंगळावर नायट्रोजन

curosity
न्यूयॉर्क- मंगळाच्या पृष्ठभागावर नासाच्या क्युरियॉसिटी रोव्हर या मंगळयानाला नायट्रोजन सापडले असून या ग्रहावर एकेकाळी जीवसृष्टी होती असे या द्वारे सिद्ध होते असे नासाने त्यांच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. क्युरियॉसिटी यानाला नायट्रेट्स सापडले आहेत. यामध्ये नायट्रोजन असते ज्यांचा उपयोग सूक्ष्मजीवांकडून केला जातो. नायट्रोजन व्यतिरिक्त पाणी आणि सेंद्रीय घटकही येथे सापडले आहेत. डीएनए आणि आरएनएच्या निर्मितीसाठी नायट्रोजन हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हा शोध महत्वपूर्ण असल्याचे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

Leave a Comment