चालकाला नियम तोडण्यास प्रतिबंध करणार फोर्डची एस मॅक्स कार

ford
चालकाला वेग नियंत्रण न पाळल्यामुळे दंड भरावा लागू नये आणि अपघातांचे प्रमाणही कमी व्हावे या उद्देशाने बनविण्यात आलेली नवीन तंत्रज्ञानाची फोर्डची एस मॅक्स कार ऑगस्टमध्ये युरोपमध्ये दाखल होत आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर जगातील अन्य कारसाठीही करता येऊ शकणार आहे. पूर्वी ठरविलेल्या वेगापेक्षा गाडीचा वेग अधिक वाढला तर तो या तंत्रज्ञानाने आपोआप कमी होतो.

विशेष म्हणजे गाडीचा पूर्वनियोजित वेग वाढताच तो कमी करण्यासाठी ब्रेक वापरले जात नाहीत. गाडीत इंटेलिजन्ट स्पीड लिमीटर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. तसेच अॅटजेस्टीबल स्पीड लिमिट टेक्निकही वापरले गेले आहे. गाडीचा वेग वाढताच चाकावर बसविलेले सेन्सर सॉफ्टवेअरकडे त्याची नोंद करतात आणि ब्रेक लावण्याऐवजी इंजिनाचा इंधन पुरवठा कमी केला जातो. परिणामी वेग कमी होतो.

यातील दुसरे उपकरण वाहतूक चिन्हे ओळखते. गाडीत बसविण्यात आलेल्या वाईड स्क्रीन व्हिडीओचा वापर त्यासाठी केला जातो आणि चालकाला वाहतूक चिन्हांबद्दल माहिती मिळत राहते. या दोन्ही तंत्रज्ञानांमुळे पूर्वनियोजित वेगापेक्षा ८ किमी अधिक वेगानेच चालक गाडी हाकू शकतो असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment