हॉटएअर बलूनच्या आकाश भ्रमणावर निर्बंध

hot-air
मुंबई : मस्त हॉटएअर बलूनमध्ये बसून हवाई सफर करण्याची स्वप्ने पाहताहात? पर्यटन विकासाच्या योजनांमध्ये हॉट एअर बलूनच्या सेवा सुरू करण्याचे कितीही मनसुबे रचले गेले, तरी या बलूनसाठी आता पोलिस, गृहमंत्रालय, डीजीसीए यांची परवानगी अत्यावश्यक आहे. शिवाय बलूनमध्ये फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीची सामग्री नेण्यास किंवा शस्त्रे बाळगण्यास किंवा रिमोट सेन्सिंगची यंत्रे नेण्यास मनाईही करण्यात आली आहे.

बराच काळपासून हॉट एअर बलूनवर नेमके नियंत्रण कुणाचे व कसे ठेवावे, याचा प्रश्न हवाई वाहतूक क्षेत्रात विचारला जात होता. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) यासंदर्भातील सुस्पष्ट नियमावली जारी केली आहे. हॉट एअर बलूनसाठी डीजीसीएने बलून म्हणजे नेमके काय, विमानापेक्षा हलका परंतु गरम हवेवर वर जाणारा फुगा म्हणजे बलून, त्याचे बास्केट म्हणजे काय आदी संज्ञांच्या व्याख्याही दिल्या आहेत.

Leave a Comment