फेसबुकचा ‘ऑन धिस डे’ म्हणून नवा उपक्रम

facebook
वॉशिंग्टन : फेसबुकने युजरला ‘ऑन धिस डे’ नावाच्या सुविधेद्वारे एखाद्या विशिष्ट तारखेला गेल्या काही वर्षात टाईमलाईनवर लिहिलेल्या पोस्ट पुन्हा प्रकाशात आणण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी तसेच युजर्सला नवनव्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा फेसबुक सातत्याने प्रयत्न करत असते. ‘ऑन धिस डे’ नावाच्या या सुविधेद्वारे एका विशिष्ट तारखेला गेल्या काही वर्षात टाईमलाईनवर शेअर केलेले फोटो, पोस्ट, व्हीडीओ पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याची संधी मिळणार आहे. यामुळे यूजरच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळून त्यावर फे्रंडसच्या प्रतिक्रियाही मिळविता येऊ शकतील. याशिवाय जुन्या आठवणींमुळे त्रास होणार नाही याचीही फेसबुक काळजी घेत आहे. त्यासाठी भूतकाळात एखादा जवळचा व्यक्तीच्या मृत्युची घटना किंवा जुनी प्रेमप्रकरणे ‘ऑन धिस डे’ द्वारे टाळल्या जाणार आहेत.

फेसबुक पाहता पाहता एखादी महत्त्वाची घटना वाचण्यासाठी किंवा पाहण्यासाठी यूजरला इतरत्र जावे लागते. यूजरला फेसबुकवर टिकवून ठेवण्यासाठी फेसबुक काही वृत्तसंस्थांशी चर्चा करत असून त्यांच्या बातम्या थेट फेसबुकवर पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करत आहे. मात्र वृत्तसंस्थेच्या साईटची लोकप्रियता तसेच व्हिजिटर्सची संख्या कमी होऊन फेसबुकची लोकप्रियता वाढण्याचा धोका असल्याने वृत्तसंस्था या प्रस्तावावर फार सकारात्मक विचार करत नसल्याचे एका वृत्तसंस्थेच्या अधिका-याने सांगितले आहे.

Leave a Comment