तीन महिन्यांत राज्यभरात स्वाइन फ्लूचे ३६० बळी

swine-flu
पुणे – जानेवारीपासून आजवर राज्यभरात स्वाइन फ्लूने ३६० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने स्वाईन फ्लूच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या घटत असतानाच रुग्णालयात सात्र व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे.

राज्यात जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत होती. नागपूरमध्ये सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पुणे शहराचा नंबर आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात नागपूरमध्ये उन्हाचा कडाका वाढल्याने तेथील रुग्ण संख्या घटली. मात्र, पुणे शहरात मार्च महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि रात्रीच्या गारव्यामुळे मृतांची संख्या वाढतच आहे. मागील दोन-चार दिवसांत उन्हाचा कडाका वाढत असला तरी स्वाइन फ्लूने एक, दोन जणांचा मृत्यू झाल्याचे चित्र आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment