टेम्स नदीवर धावली टाटांची जग्वार

jaguar
टाटा समुहाने विकत घेतलेल्या जग्वार कंपनीचे नवे मॉडेल एक्सएफ पुढच्या आठवड्यात र्लांच केले जात असताना त्याच्या जाहिरातीसाठी नवी शक्कल कंपनीने लढविली. लंडनच्या प्रसिद्ध टेम्स नदीच्या दोन्ही तिरांवर बांधलेल्या तारांवरून ही गाडी चालविली गेली. ७८७ फूट रूंदीचे हे अंतर गाडीने यशस्वीपणे पार केले. हॉलीवूडसाठी स्टंट करणारा प्रसिद्ध स्टंटमन जिम डाऊडॉल याने जग्वार तारांवरून पलिकडच्या तीरावर नेण्याची कमाल दाखविली.

जग्वारच्या कार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेक बाँड चित्रपटात तसेच इंडियाना जोन्स साठी जग्वारच्या कारचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. बाँड चित्रपटात स्काय फॉल मध्ये जग्वार सीएक्स ७५ एसचो वापर केला गेला आहे तर आगामी स्पेक्टर साठी रेज रोव्हर एसव्हीआर व डिफेंडर बिग फूट कारचा वापर केला जात आहे. जग्वार एक्सएफ किती हलकी आणि वेगवान आहे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी ती टेम्स नदीवरून तारांवर चालविली गेली असे सांगितले जात आहे.

भारतात जग्वारच्या विविध मॉडेल्सच्या किमती ४७ लाखांपासून ७३ लाखांपर्यंत आहेत.

Leave a Comment