चौथ्या नेव्हिगेशन सॅटेलाईटचे काउंटडाऊन सुरू

esro
चेन्नई – आज सकाळी ५.४९ वा. भारताच्या चौथ्या नेव्हिगेशन सॅटेलाईटचे कांउटडाऊन सुरू झाले असल्याचे इस्रोने सांगितले. पीएसएलव्ही २७ या क्षेपकाद्वारे क्षेत्रीय निर्देशक उपग्रह आयआरएनएसएस १ डी चे प्रक्षेपण काउंटडाऊन सुरू केल्याच्या ६० तासानंतर म्हणजेच २८ मार्च ५.१९ सायंकाळी होणार आहे. भारताने आतापर्यंत ३ नेव्हिगेशन सॅटेलाईट अवकाशात सोडलेले आहेत. या उपग्रहाचे वजन १,४२५ कि. ग्रॅ. आहे. श्रीहरिकोटा येथील रॉकेट पोर्टहून या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे.

Leave a Comment