रेल्वे तिकीट बुकींगसाठी रूपे प्रीपेड कार्ड

rupay
भारतीय रेल्वे प्रवासी आता रेल्वेची तिकीटे रूपे प्रीपेड कार्डच्या सहय्यानेही आरक्षित करू शकणार आहेत. सुरवातीला केवळ तिकीट आरक्षणापुरती असलेली ही सुविधा नंतर खरेदी आणि रेल्वेतील अन्य सेवांसाठी द्याव्या लागणार्‍या देयकांसाठीही वापरता येणार आहे. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड ट्रॅव्हल कार्पोरेशनने रेल्वे प्रवाशाच्या सुविधेसाठी युनियन बॅक ऑफ इंडियाच्या सहकार्याने रूपे प्रीपेड कार्ड सेवा मंगळवारी सुरू केली आहे.याचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीत करण्यात आले.

व्हीसा आणि मास्टरकार्डप्रमाणेच ही भारतीय कार्ड पेमेंट सुविधा आहे. ती फक्त भारतातच वापरता येणार आहे. यासाठी ग्राहकाला युनियन बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही. ही डेबिट कार्ड सेवा केवायसीच्या रूपात प्रथम १० हजार रूपये भरल्यानंतर वापरता येणार आहे. केवायसीची सर्व पूर्तता केल्यानंतर वर्षाला कार्डाची सीमा ५० हजार रूपयांपर्यंत वाढणार आहे. या सेवेला १ लाख रूपयांपर्यंत अपघात विमा संरक्षणही आहे आणि महिन्यातून ५ वेळा ही सेवा मोफत वापरता येणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी १० रू शुल्क आकारले जाणार आहे.

Leave a Comment