भारतात २० टक्के लोक वापरतात इंटरनेट

internet
वॉशिंग्टन : एका अभ्यासाद्वारे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ २० टक्के लोक इंटरनेट वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जगातील ३२ विकसनशील देशांतील इंग्रजी बोलू शकणा-या ३६,६१९ जणांचा द प्यू रिसर्च सेंटर द्वारे अभ्यास करण्यात आला. १७ मार्च ते ५ जून दरम्यान करण्यात आलेल्या या अभ्यासात एकूण ३२ देशांमध्ये इंटरनेट वापरणा-यांचे प्रमाण हे ४४ टक्के असल्याचे आढळून आले आहे. तर भारतामध्ये एकूण लोकसंख्येपैकी केवळ २० टक्के लोकसंख्या इंटरनेट वापरत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही निमित्ताशिवाय ही लोक स्मार्ट फोन आणि इतर माध्यमांद्वारे इंटरनेटवर ऑनलाईन असतात. भारतातील एकूण इंटरनेट वापरणा-यांपैकी ६५ टक्के इंटरनेट युजर्स हे फेसबुक किंवा ट्विटरवर ऑनलाईन असतात. तसेच ५५ टक्के वापरकर्ते हे नोकरीसाठी ऑनलाईन असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. भारताशिवाय बांगलादेशमध्ये एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के तर पाकिस्तानमध्ये ८ टक्के लोक इंटरनेट वापरत असल्याचे आढळले आहे. अभ्यासातील ४२ टक्के जणांना इंटरनेमुळे नैतिकतेवर वाईट परिणाम होत असल्याचे वाटते, तर २९ टक्के जणांना इंटरनेटमुळे चांगला परिणाम होत असल्याचे वाटते.

Leave a Comment