गोवा कला संस्कृती विभागात जीन्स, स्लीव्हलेस कपड्यांवर बंदी

jeans
गोव्यातील कला संस्कृती विभागातील कर्मचार्यां साठी ड्रेस कोड लागू करण्यात आला असून त्यानुसार येथील कर्मचारी यापुढे जीन्स, अनेक खिसे असलेल्या पँटस, स्लीव्हलेस, कॉड्राय, टीशर्टस असे कपडे वापरू शकणार नाहीत. विधानसभेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मंत्री दयानंद मांदेकर यांनी ही माहिती दिली.

कला संस्कृती विभागाचे संचालक प्रसाद लोलायकर या संदर्भात म्हणाले की या कार्यालयाच्या परिसरात किमान शिष्टाचार आणि सभ्यता पाळली जायला हवी व त्यामुळे अशिष्ट वाटू शकतील असे कपडे वापरण्यावर बंदी आणावी अशी मागणी गोव्यातील अनेक मंत्र्यांनी वारंवार केली होती. त्यामुळे कर्मचार्‍यांनी केवळ फॉर्मल ड्रेस मध्येच यावे असे आदेश दिले गेले आहेत. कार्यालयाच्या संस्कृतीला शोभतील असेच कपडे कर्मचार्‍यांनी घालावेत अशी मागणी भाजप सरकारातील कांही मंत्री करत होते असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार आता जीन्स व तत्सम फॅशनेबल कपडे वापरावर कार्यालय परिसरात बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Comment