क्षयरोगामुळे मुंबईत ९ हजार बळी

tb
मुंबई : क्षयरोगामुळे मुंबईत तब्बल नऊ हजार जणांचा गेल्या सात वर्षांत मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ दररोज या आजारामुळे सरासरी तीन जणांना जीव गमवावा लागला. ही अधिकृत आकडेवारी असून वास्तविक मृत्यूंची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. या आजाराविरोधात सर्वागीण उपाययोजना करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले असून खासगी डॉक्टरांकडून उपचारासाठी येणा-या रुग्णांना मोफत औषधे देण्यासाठी ई व्हाउचरची सुविधा सोमवारी आयुक्तांच्या हस्ते सुरू करण्यात आली.दरवर्षी क्षयरोगाचे सरासरी ३० हजार नवीन रुग्ण आढळतात.

नवीन तंत्रज्ञान व पद्धतीमुळे पालिकेने २०१० पासून एमडीआर (मल्टी ड्रग रेझिस्टंट) रुग्ण व २०१२ पासून एक्सडीआर (एक्स्टिड्ढमली ड्रग रेझिस्टंट) रुग्णांचीही माहिती ठेवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एमडीआरचे ९३७५ रुग्ण आढळले असून एक्सडीआरच्या ६२७ रुग्णांची नोंद आहे. गेल्या सात वर्षांतील ९ हजार मृत्यूंमध्ये ११४४ मृत्यू एमडीआर रुग्णांचे होते. औषधे नियमित तसेच पूर्ण कालावधीपर्यंत न घेतल्याने क्षयरोग बळावत असल्याचे लक्षात आल्याने आर्थिक साहाय्य तसेच उपचारांमधील सातत्य ठेवण्यासाठी पालिकेने बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने कार्यक्रम हाती घेतला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment