केंद्र सरकारची राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी २ हजार कोटींची मदत

farmer
मुंबई : महाराष्ट्राचा शेतकरी दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस अशा एका पाठोपाठ आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे उध्वस्त झालेला असताना केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून किमान ७ हजार कोटी रुपयांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचा अंदाज असून ही मदत त्या तुलनेत अत्यंत कमी आहे; पण आजवर केंद्राकडून राज्याला मिळालेली ही सर्वाधिक मदत असल्याचा दावा करताना मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

राज्याची आर्थिक स्थिती हालाखीची असताना पाठोपाठ आलेल्या नैसर्गिक आपत्तीने राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे राज्याला किमान ४ हजार कोटी रुपयांची मदत मिळावी, असा राज्य सरकारचा सतत प्रयत्न सुरू होता; परंतु केंद्राने आज केवळ २ हजार कोटीची मदत जाहीर केली.
दुष्काळग्रस्त राज्यांना द्यावयाच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहनसिंग आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी महाराष्ट्रासाठी २ हजार कोटी रुपयांची मदत दिली असल्याचे जाहीर केले.

Leave a Comment