ह्युवाईचे ऑनर ६ प्लस आणि ऑनर फोर एक्स भारतात

owner
ह्युवाई कंपनीने भारतीय बाजारात त्यांचे नवे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. ऑनर सिक्स प्लस आणि ऑनर फोर एक्स या दोन स्मार्टफोनची विक्री मंगळवारपासून फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. त्यांच्या किमती अनुक्रमे २६४९९ व १०४९९ रूपये आहेत.

ऑनर सिक्स प्लस साठी ५.५ इंची फुल एचडी स्क्रीन, ३जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी, वाढविता येण्याची सुविधा आहे. मायक्रो कार्डचा वापर केला नाही तर या फोनसाठी ड्युअल सिम वापरता येणार आहे. ८ एमपीचा फ्रंट तसेच ८ एमपीचा रियर कॅमेरा ड्युअल एलई फ्लॅशसह दिला गेला आहे. अॅड्राईड किटकॅट ४.४ ओएस देतानाच कंपनीने ते लॉलीपॉपमध्ये अपग्रेड करण्याचा वादाही केला आहे.

ऑनर फोर एक्ससाठी ५.५ इंची एचडी स्क्रीन, २ जीबी रॅम, ८ जीबी मेमरी, मायक्रो कार्डने वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर एलईडी फ्लॅशसह कॅ मेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी याची फिचर्स असून दोन्ही फोनसाठी थ्रीजी, फोरजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस कनेक्टीव्हीटी आहे. ऑनर फोर एक्ससाठी ड्युअल सिम असून ते सर्व भारतीय फोर जी ब्रँडला सपोर्ट करणार आहे.

Leave a Comment