सोशल मीडियासंदर्भातील निर्णयाची शक्यता

justice
नवी दिल्ली – आज आयटी कायदा-६६ संदर्भात सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त मजकूर टाकल्यास या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आज महत्त्वाचा निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. न्यायालयाने या कायद्यासंदर्भात याआधीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. मात्र केंद्राने हा कायदा कायम ठेवण्याचे नेहमीच समर्थन केल आहे. या कायद्यानुसार गंभीर प्रकरणात कारवाई केली जाईल, असेही सरकारने म्हटले आहे.

मुंबईत श्रेया सिंघल या तरुणीने २०१३ मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात फेसबुकवर मजकूर टाकला होता. याप्रकरणी दोन तरुणींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी २७ फेब्रुवारीला न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

दुसरीकडे उत्तरप्रदेशातील मंत्री आजम खान यांच्यासंदर्भात फेसबुकवर मजकूर टाकल्याने एका युवकाला अटक करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने नोटीस बजावत सरकारला या कारवाई संदर्भात खुलासा करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment