सहा महिन्यांनी वाढला मंगळयानाचा कालावधी

orbiter
बंगळूरु – आणखी सहा महिन्यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयानाचा कालावधी वाढवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.

मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत २४ मार्च २०१४ रोजी सहा महिने पूर्ण केले असून इस्त्रोने या मंगळयानाचा कालावधी सहा महिने निश्चित केला होता. ही मोहिम यशस्वी झाल्याने हा कालावधी आणखी सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळयानाकडे पुरेसा इंधनसाठा असल्याने मंगळयानाचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

मंगळग्रहाचा अभ्यास करण्यासाठी यानामध्ये बसवण्यात आलेली शास्त्रीय उपकरणे मंगळाबाबतची सर्व माहिती पुरवत आहेत. मंगळयानामध्ये पाच भारतीय बनावटीची उपकरणे बसवण्यात आली आहेत. यामध्ये मार्स कलर कॅमेराही आहे. या कॅमे-याकडून मंगळाच्या पृष्ठभागाची अनेक छायाचित्रे उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत मंगळयानाने ३०० हून अधिक छायाचित्रे पाठवली आहेत.

Leave a Comment