प्रणव मुखर्जी केदारनाथ दर्शनाला जाणार

kedarnath
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २४ एप्रिल रोजी उत्तराखंडातील चारधाम यात्रेतील महत्त्वाचे स्थान असलेल्या केदारनाथाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे समजते. त्यांच्या आगमनाची तयारी आत्तापासूनच सुरू करण्यात आली असून प्रशासकीय अधिकारयानी तसेच सुरक्षा यंत्रणांनी केदारनाथ परिसरात हालचाली सुरु केल्या आहेत. सध्या केदारनाथावर बर्फाचे आवरण आहे मात्र उन्हाळा सुरू झाल्याने बर्फ वितळायला सुरवात झाली आहे. त्यामुळे मार्च अखेर राष्ट्रपतींच्या दौर्‍याच्या तयारीला अधिक वेग येईल असेही समजते.

मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती केदारनाथ येथे येत आहेत. केदारनाथ येथे ज्या हेलिपॅडवर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरणार आहे तेथील बर्फ हटविणे आवश्यक आहे. त्याचीही तयारी सुरू असल्याचे आणि राष्ट्रपतींच्या भेटीवेळी हवामानही सुधारण्याची खूपच शक्यता असल्याचे संबंधित अधिकार्‍याकडून सांगितले गेले आहे.

Leave a Comment