ट्विटरवर लैंगिक भेदभावाचा आरोप

twitter
नवी दिल्ली : सोशल मीडियातील सर्वात आघाडीच्या मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्क साईट म्हणजेच ट्विटरवर लैंगिक भेदभावाचा आरोप झाला असून ट्विटरच्याच एक माजी कर्मचारी टिना हुआंग हिने कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. टिना हुआंगने ट्विटरमध्ये जवळपास पाच वर्षे काम केले आहे. कॅलिफोर्नियाच्या प्रांतिक कोर्टात टिनाने ट्विटरविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ऑक्टोबर २००९ ते जून २०१४ या कालावधीत टिना हुआंगच्या ‘लिंक्ड इन’वरील प्रोफाईलनुसार तिने ट्विटरसाठी काम केले आहे. ट्विटर महिलांना डावलून केवळ पुरुषांचेच प्रमोशन करते आणि हे बेकायदेशीर आहे, असा आरोप टिना हुआंग हिने ट्विटरवर केला आहे.
हुआंगचे म्हणणे आहे की, ट्विटरमध्ये काही वर्षे काम करुन ही कोणत्याही प्रकारचे प्रमोशन झाले नाही. सहकारी कर्मचाऱ्यांकडून कामाचे नेहमीच कौतुक होत असले तरीही प्रमोश होत नसल्याचा तिचा दावा आहे.

Leave a Comment