त्सुनामीपासून बचावासाठी जपान बांधणार प्रचंड भिंत

tsunami
चार वर्षांपूर्वी जपानला तडाखा दिलेल्या महाभयंकर त्सुनामीत सावरलेल्या जपानने या निसर्गसंकटाविरोधात संरक्षणाची तयारी सुरू केली आहे. भविष्यात त्सुनामीमुळे पुन्हा एकदा विध्वंस होण्यापासून बचाव करता यावा यासाठी उत्तरपूर्व किनारपट्टीवर ४०० किमी लांबीची महाकाय पाच मजली उंचीची काँक्रीट भिंत म्हणजेच समुद्री भिंत बांधण्याची योजना आखली आहे. किनारपट्टीवर विविध ठिकाणी ही भिंत उभारली जाणार आहे. ८२० अब्ज येन म्हणजे ४२५७० कोटींच्या या योजनेला अनेक स्तरांतून विरोध केला जात आहे.

जपानमधील कांही तज्ञांच्या आणि नागरिकांच्या मतेही अशी महाकाय काँक्रीट भिंत बांधणे म्हणजे समुद्री जीवन धोक्यात टाकणे आहे. अशी भिंत बांधली केली तर पर्यावरणाला हानी पाहोचेल, मासेमारीचा व्यवसाय संकटात येईल आणि या भिंतीपासून प्रत्यक्षात किती सुरक्षा मिळेल हे सांगता येणार नाहीच. त्यामुळे इतका प्रचंड खर्च करून भित बांधण्यापेक्षा त्सुनामीचा धोक असलेल्या भागातील नागरिकांचेच उंच जागी स्थलांतर करणे परवडणारे आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही योग्य ठरणार आहे.

भिंत बांधावी या मताच्या तज्ञांच्या मतानुसार मात्र भक्कम भिंत त्सुनामीपासून नक्कीच संरक्षण देऊ शकेल. तसेच कांही काळासाठी त्यामुळे नागरिकांना रोजगारही मिळणार आहे याचा विचार करायला हवा.

Leave a Comment