जगभरातील हवामान संस्थांचा अंदाज; यंदा समाधानकारक पाऊस

rain
नवी दिल्ली : जगभरातील वेधशाळेनीं यंदा भारतात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला असून भारतातील यंदाचा मान्सून कसा राहील याबाबत जगभरातील हवामान संस्था वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. स्कायमेटने फेब्रुवारी अखेरच्या अल निनो प्रभावाच्या अध्ययनासह पहिला मान्सूनविषयक अंदाज वर्तवला असून यंदा भारतात ओला किंवा कोरडा दुष्काळ किंवा महापुरासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे.

दुष्काळ व महापुरास कारणीभूत ठरणारा अल निनोचा प्रभाव यंदा फारसा नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. गेली तीन वर्षे सातत्याने दुष्काळ, गारपीट व अवकाळी पावसाने हैराण झालेल्या भारतासाठी हे आशादायक चित्र आहे. यंदा दक्षिण आशिया, हिंदी महासागर भागात अल निनोचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचा अहवाल नुकताच अमेरिकेच्या सागरीय हवामान अंदाज केंद्राने (नोआ)वर्तवला आहे. ही संस्था सागरीय हवामानाशिवाय अल निनोवर लक्ष ठेवून असते.सध्या अल निनो सामान्य स्थितीत असून यंदा तो फार तीव्र होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भारतात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतात सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यातील एका अधिका-याने वर्तवला आहे.

Leave a Comment