हजारो गिर्यारोहकांना ‘एव्हरेस्ट’साठी मुदतवाढ

eveerest
काठमांडू : गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहीम खराब हवामानामुळे अर्धवट सोडावी लागलेल्या हजारो गिर्यारोहकांना नेपाळ सरकारने त्यांचे परवाने २०१९ पर्यंत वापरण्याची परवानगी दिली. गेल्या वर्षी झालेल्या हिमप्रपातामध्ये १६ शेर्पांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर एव्हरेस्ट मोहिमा रद्द केल्या होत्या.

एव्हरेस्ट मोहिमेसाठी दिलेल्या परवानगीद्वारे नेपाळ सरकारला मोठा महसूल मिळत असतो. गेल्या वर्षी ३३४ मोहिमांना दिलेल्या परवानगीतून ३६ लाख डॉलरचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यातील बहुतांश मोहिमा रद्द झाल्या होत्या. गेल्या वर्षी परवाने दिलेल्या गिर्यारोहकांना आता पाच वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे हाच परवाना वापरून २०१९ पर्यंत कधीही मोहीम पूर्ण करता येईल, असे नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रवक्ते मोहनकृष्ण सपकोटा यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील निर्णय घेण्यास उशीर झाल्याने अनेक गिर्यारोहकांनी यंदाच्या मोहिमा रद्द केल्या आहेत. दरम्यान, गिर्यारोहकांना परवाने पुन्हा वापरण्याची मुभा दिली असली, तरीही त्या गिर्यारोहकांना अतिरिक्त एक हजार डॉलरची फी भरावी लागणार आहे.

Leave a Comment