भारताच्या तंबाखूजन्य पदार्थांसंदर्भातील निर्णयाचे कौतुक

who
न्यूयॉर्क : भारताकडून सिगारेटच्या खोक्यावर, बिडी-बंडलावर किंवा कोणत्याही तंबाखू उत्पादनाच्या वेष्टनावर ८५ टक्के जागेत सचित्र ‘वैधानिक इशारा’ छापण्यासाठी करण्यात आलेल्या सक्तीचे जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) स्वागत करण्यात आले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने येत्या १ एप्रिलपासून सिगारेट व बिडीउत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या वेष्टनावर दोन्ही बाजूला ‘धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे’ असा इशारा छापणे बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर तंबाखू किंवा आरोग्यविषयीच्या १६ व्या जागतिक परिषदेच्या पहिल्या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे स्वागत करण्यात आले. भारताने तंबाखूजन्य पदार्थांबाबत अशा प्रकारचे नियम सूचित करून सुंदर पाऊल उचलले आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या वेष्टनांवर सर्वांत मोठ्या आकारात वैधानिक इशारा छापणार भारत हा पहिला देश आहे. यासंदर्भात भारताला भविष्यात जी काही मदत लागेल ती आमच्या संघटनेकडून पुरविण्यात येईल, असे डब्ल्यूएचओच्या असंसर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाचे संचालक डग्लस बेटचर यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात हा निर्णय सूचित करण्यात आला होता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment