सोनीने जपानमध्ये पहिला सिम फ्री मोबाईल नुकताच लाँच केला आहे. सोनी एक्सपिरिया जे वन कॉम्पॅक्ट या नावाने आलेल्या या स्मार्टफोनसाठी प्री ऑर्डर २७ मार्चपासून घेतल्या जाणार असून त्याची किंमत ५९१८४ जपानी येन म्हणजे ३० हजार भारतीय रूपये इतकी आहे. हा फोन मोबाईल व्हर्च्युअल ऑपरेटर सपोर्ट करतो व त्यामुळे त्याला सिमची गरज लागत नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. व्हाईसकॉल व टेक्स्ट मेसेजसाठी जपानमध्ये युजरला एनटीटी डोकोमो कडून खास पॅकेज दिले जाणार आहे. त्यासाठी युजरला फक्त हे कनेक्शन घ्यावे लागेल.
सोनीने आणला सिम फ्री एक्सपिरीया जे वन
या स्मार्टफोनसाठी २०.७ एमपीचा रियर कॅमेरा, २.२ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ४.३ इंची स्क्रीन,२ जीबी रॅम, अॅड्राईड किटकॅट ४.४.४ ओएस, १६ जीबी मेमरी, मायक्रो एसडी कार्डने वाढविण्याची सुविधा, फोरजी, ब्ल्यू टूथ, वायफाय, जीपीएस कनेक्टीव्हीटी अशी फिचर्स आहेत. फोनचे वजन १३८ ग्रॅम असून तो वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. सिमशिवाय स्मार्टफोन हा नवीनच अनुभव असल्याचे युजरचे म्हणणे आहे. भारतात हा फोन कधी येणार याविषयी कंपनीने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.