मुलाचे वडील कोण – इंटरनेटवर दिली जाहिरात

baby
पाश्चिमात्य देशात वन नाईट स्टँड ही संकल्पना बराच काळापासून रूळलेली आहे. म्हणजे ओळखीच्या अनोळखी अशा कुणाबरोबरही थोड्याच्या ओळखीवर अथवा परिचयावर एखादी रात्र एकत्र काढणे. ऑस्ट्रेलियातील एका महिलेसाठी मात्र वन नाईट स्टँड निराळेच कोडे घेऊन आले. अशाच एका प्रसंगात कधीतरी ही महिला गरोदर राहिली मात्र हे मूल नक्की कोणाचे हेच तिला आठवेना. कारण १ दिवसापुरताच तिचा सहवास संबंधित पुरूषाशी झाला होता.

बायनका असे या महिलेचे नाव असून तिच्यासाठी ही बातमी आनंद घेऊन आली आणि कोडेही. त्याचे असे झाले की २०११ साली बायनकाच्या वैद्यकीय तपासण्या झाल्या तेव्हा तिला मूल होऊ शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यावेळी ती २५ वर्षांची होती. हा धक्का पचवून तिने रोजचे आयुष्य जगायला सुरवात केली. गतवषी एप्रिलमध्ये अशाच वन नाईट स्टँडमध्ये तिला अनोळखी पुरूषाकडून गर्भधारणा झाली. मात्र बरेच दिवस बायनकाला त्याचा पत्ताच नव्हता. कांही त्रास होतोय म्हणून ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला ती गरोदर असल्याचे समजले. आपल्याला मूल होऊ शकणार नाही याची कल्पना असलेल्या बायनकाला हे ऐकून खूपच आनंद झाला मात्र या मुलाच्या बापाचे नांव काय हेच तिला आठवेना. खूप विचार केला तेव्हा त्या व्यक्तीचे नांव जरोमी असल्याचे तिला आठवले पण तो कुठला हे माहितीच नव्हते.

अखेर तिने ऑनलाईन जाहिरात देऊन मुलाच्या बापाचा पत्ता लावण्याचा प्रयत्न केला. तिला अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही मात्र या जाहिरातीची चर्चा जोरात सुरू आहे.

Leave a Comment