‘अंडरबूब सेल्फी’ वर थायलंडमध्ये बंदी

selfi
बँकॉक : महिलांच्या ‘अंडरबूब सेल्फी’ वर थायलंड सरकारने बंदी घातली आहे. सेल्फी क्लिक करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यावर देखील कडक प्रतिबंध घालण्यात आले आहेत. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.सध्या सेल्फीचा ट्रेड आला असला तरी थायलंड सरकारने २००७ मध्ये यावर हरकत नोंदवली होती. या सगळ्या प्रकारातून सायबर क्राइम अ‍ॅक्टचे उल्लंघन होत असल्याचे देखील थायलंड सरकारने म्हटले होते. परंतु, अंडरबूब सेल्फी घेऊन सोशल मीडियावर ते शेअर करणा-या महिलांचा शोध घेणे सरकारसमोर मोठे आव्हान असेल. दरम्यान, सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्याना बहुतांश महिलांचा चेहरा अस्पष्ट असतो. ‘अंडरबूब सेल्फी’ मध्ये महिलांच्या वक्षस्थळाचा खालील भाग दिसतो. एका वृत्तसंस्थाच्या अहवालानुसार, पॉप सिंगर रिहाना ही ‘अंडरबूब’ लूक खूप पसंत करते. मॉडेल्स तसेच सेलेब्सचे ‘अंडरबूब सेल्फी’ अन्य महिलांना देखील उत्तेजित करतात. त्यामुळे थायलंड सरकारने हा जनहिताचा निर्णय घेण्यात आल्याचे थायलंडमधील समाजकल्याण मंत्रालयाचे प्रवक्ता अनंदा चौचोटी यांनी सांगितले आहे.

Leave a Comment